पुस्तकाबाहेरचा किडा
बरेच दिवसात blog कडे फिरकणंही झालं नाही. संसार, दुसरं काय? संसार मधे म्हणे "सृ" धातु आहे - "सृ" म्हणजे सरणे किंवा संपणे. पण संसारात काम, काळज्या, दमणूक या गोष्टी संपत नाहीत, संपतो तो फक्त वेळ! अर्थात हा झाला फक्त "excuse", कारण म्हणतात ना, when there is a will, there is a way.
मला tag केलं अशी "बातमी" कळली. "पुस्तकनिष्ठांची मांदियाळी" साठी माझ्यासारख्या पुस्तकाबाहेरच्या किड्याला tag करायचं म्हणजे आडाण्याला गणितज्ञांच्या परिषदेला बोलावण्यासारखं आहे. ज्यांनं एकूणातच पाच पुस्तकं वाचलेली आहेत, त्याला आवडणारी पाच पुस्तकं विचारून चांगलंच अडचणीत टाकण्यात आलंय ! अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला वाचनाची वगैरे फार काही आवड नाही. म्हणजे नावड आहे असं नाही पण अगदी रात्री जागून पुस्तकं वाचणं आपल्याला नाही बुवा जमत. या बाबतीत मी पुलंच्या धोंडो भिकाजी जोश्यांसारखी आहे. रोजचं वर्तमानपत्रं हाती घेणं झालं तरी मी स्वत:ला धन्य समजते. तरीपण आलिया भोगासी असावे सादर :-), आता tag केलंय म्हटल्यावर काहीतरी लिहिणं आलंच की नाही!
१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -
फुलवा - डॉ श्रीश क्षीरसागर
२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -
निसर्गप्रेमी लोकांनी प्रेमात पडवे असे पुस्तक. लेखकाला अतिशय जवळून ओळखण्याचं भाग्यं मला आहे, म्हणून हे पुस्तक माझ्या हाती आलं. अजून मी फक्त अर्ध्यावरच आहे, पण फार मोहवून टकणारं पुस्तक आहे हे. लोकसत्तेत प्रकाशित झालेल्या "फुलवा" या रानफुलांच्या माहितिप्रद लेखमालेवर हे पुस्तक आढरित आहे. शास्त्रशुद्ध माहिती इतक्या आकर्षक रितीने मांडणं हा तर श्रीशचा हातखंडच आहे. आपल्या ओळखीचीच फुलं मला या पुस्तकाच्याद्वारे नव्यानंच भेटली. प्रत्येक पान वाचताना आणि मुख्य म्हणजे फोटो पहाताना अक्षरश: भान हरपतं. ज्यांना "रा्नभूल" लागली आहे त्यांनी तर जरूर उराशी बळगावं असं हे पुस्तक आहे.
३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके :
मृत्युंजय - शिवाजी सावंत
व्यक्ती आणि वल्ली - पु ल
एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
साद देती हिमशिखरे - जी के प्रधान
चीपर बाय द डझन - मंगला निगुडकर
४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके :
श्यामची आई - साने गुरुजी
आय डेअर - किरण बेदी
मी कसा झालो - आचार्य अत्रे
अग्निपंख - ए पी जे अब्दुल कलाम
हसत जगावं - रमा मराठे
५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे :
मृत्युंजय - शिवाजी सावंत - हे पुस्तक वाचून मला कित्येक वर्ष लोटली. प्रथम वाचलं ते शाळेत असताना. त्यापूर्वी कर्णाची ओळख फक्त "अमर चित्र कथा" मधूनच होती. त्यात कर्ण म्हणजे कौरवांचा सखा म्हणून रंगवलेली व्यक्तीरेखा होती. मला असं वाटतं की शाळेत आपल्याला फार "black and white" किंवा "good guys and bad guys" या धाटणीनं शिकवत असत. या पुस्तकानं मला अगदी लहानपणी एक वेगळा विचार करायला शिकवला. "stereotypical" विचारसरणी दूर करायला शिकवली. या पुस्तकातले दोन प्रसंग उगीचच फार लक्षात रहिले आहेत - आता अगदी शब्द आठवत नाहित, पण एक प्रसंग म्हणजे द्रोणाचार्यांनी घेतलेल्या नेमबाजीच्या स्पर्धेबद्दलचा - पोपटचा डोळा आणि अर्जुनाचं एकाग्र मनाची साक्ष देणारं उत्तर तर शाळेत अगदी पहिली-दुसरीपासून पाठ होतं. पण सावंतांनी या प्रसंगी कर्ण असता तर काय म्हटला असता हे फारच छान लिहिलय. मला अगदी तंतोतंत शब्द आठवत नाहीत, पण कर्ण म्हणतो की मला जर तोच प्रश्न विचारला असता, तर मी सांगितलं असतं की माझं शरीर हाच एक टोकदार बाण आहे असा विचार करून मी त्या पोपटाच्या डोळ्याकडे झेपावलो असतो!
दुसरा प्रसंग असा की राजसूय यज्ञाच्या वेळी कर्ण जेवा्यला बसलेला असताना दौपदी वाढायला आली. खाली बघून जेवताना अतिशय सुंदर पावलं ताटासमोर आल्यावर कर्णानं मान उचलली आणि द्रौपदीचा पदर ढळलेल्या अवस्थेत होता. यात खरं तर कर्णाचा काहीच दोष नव्हता. पण भर पंक्तीत द्रौपदीनं कर्णाचा खूप अपमान केला "कावळ्यानं राजहंसीकडे पाहू नये ..." हा कर्णावरचा अपमान मला फार घोर लावून गेला होता कारण पुढे द्रौपदीची अवहेलना करताना कर्ण त्यात सहभागी होतो त्याचं हे बीज होतं का काय असं मला वाटत रहिलं, आणि "न्याय्य आणि अन्याय्य" गोष्टिंमधे किती फिकट सीमारेषा आहे याचा विचार करायला मी सुरवात केली होती. असो... हे वाचून दोन तपांपेक्षा जास्त काळ उलटला आणि आज अचानक खूप दिवसांनी आवडत्या पुस्तकाचा विचार करायला लागल्यावर "मृत्युंजय"ची आठवण जागी झाली!
आता या लोकांना "tag" करते:-
सोनाली
nikone
केदार